जागतीक डॉक्टर दिना निमीत्ताने खारघर मधील डॉक्टरांचा भाजपाच्या वतीने सत्कार 


 


 


नवी मुंबई :(संतोष वाव्हळ ) जागतिक डॉक्टर दिनाच्या निमित्ताने खारघर शहरातील ज्या डॉक्टरांनी रुग्णांची अविरत सेवा केली व अजूनही करत आहेत त्यांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून खारघर मध्ये प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आले. डॉक्टर सर्वच आहेत परंतु सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या जीवाची तसेच कुटुंबातील सदस्यांची पर्वा न करत आपण घेतलेले शिक्षण व त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे ह्या भावनेने व सामाजिक बांधिलकीने रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून कार्यररत असणाऱ्या विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा सत्कार आज भाजपा खारघर तळोजा मंडळ आणि खारघर भाजपा वैद्यकीय सेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या कार्यक्रमा प्रसंगी भाजपाचे खारघर येथील तळोजा मंडळ अध्यक्ष ब्रिजेशभाई पटेल, वैदयकिय सेल संयोजक किरण पाटील तसेच खारघर डॉक्टर असोसिएशनचे सचिव डॉ वैभव भदाणे यांनी खालील डॉक्टरांचे त्यांच्या कार्यरत असणाऱ्या हॉस्पीटल मध्ये जाऊन प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ अशोक घोडके, डॉ उद्धव तळणीकर, डॉ रत्नेश म्हात्रे, डॉ अजिंक्य भंडारी, डॉ अतुल खरात, डॉ सुहास खर्चे, डॉ उमेश एगल, डॉ पंकज तितर, डॉ वैभव भदाने, डॉ इंद्रजित माने, डॉ रामकृष्ण क्षार, डॉ सचिन खोडदे, डॉ अनिकेत मुळे, डॉ गजानन चव्हाण या डॉक्टरांचा सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला आहे. या सर्व डॉक्टरांनी खारघर वासीयांना कामा व्यतिरीक्त घराच्या बाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा असा संदेश दिला आहे. तसेच सर्व खारघर वासीयांना आरोग्य संबंधित काही तक्रार असल्यास किंवा वैद्यकीय सल्ला हवा असल्यास मोफत टेलिफोनिक सवांदाची सुविधा खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने उपलब्ध करण्यात आली आहे.