शिवसेनेचे खारघर विभाग प्रमुख मनेश पाटील यांना पितृशोक !!

शिवसेनेचे खारघर विभाग प्रमुख मनेश पाटील यांना पितृशोक !!



खारघर : मुर्बी – खारघर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख मनेश पाटील यांचे वडील विनायक तुकाराम पाटील यांचे अल्पशः आजाराने सोमवार दिनांक २७ जुलै रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि ५ मुले असा परिवार आहे.


कै.विनायक पाटील हे मुर्बी गावचे पोलीस पाटील वसंत पाटील यांचे भाऊ तर शिवसेना खारघर शहर संघटक अनिल पाटील यांचे चुलते आहेत.


कै. विनायक पाटील यांचा दशक्रियाविधी ५ ऑगस्ट रोजी शिवमंदिर तळोजा मजकूर येथे होणार असून उत्तरकार्य ८ ऑगस्ट रोजी मुर्बी येथील केशव अपार्टमेंट या राहत्या घरी होणार आहे.