गणपती उत्सवानिमित्त खारघरवासीयांची पालकमंत्र्यांकडे कृत्रीम तलावाची मागणी


 


खारघर: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील खारघरमधील विविध सोसायट्यांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. खारघरमधील सेक्टर १६, १७ व १८ मध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त सोसायट्या आहेत. तरिदेखील सरकारने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रीम तलावाची आवश्यकता असल्याने. खरघरचे शहराध्यक्ष बळीराम नेटके यांनी सर्व खारघरवासीयांतर्फे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. खारघरमध्ये बर्याच ठिकाणी मोकळे भूखंड असल्या कारणाने कृत्रीम तलावासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे येथील सोसायट्यांमध्ये दिड दिवसाचा गणपती बसवण्याचा निर्णय येथील रहिवाश्यांनी घेतला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष बळीराम नेटके यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना पत्र लिहून पनवेल महानगरपालिका क्षेत्र व सिडको प्रशासनामधील अधिकाऱ्यांना कृत्रीम तलावाबाबत सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.