आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र संदीप रामचंद्र कडूसकर यांची सिमा सुरक्षा बल (BSF) मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून उपनिरीक्षक या पदोन्नती करण्यात आलेली आहे. दिनांक ७/१०/२०२० रोजी त्यांची या पदावर निवड झालेली आहे.
संदीप कडूसकर हे BSF मध्ये २००३ पासून कार्यरत आहेत. तुरूवातीला त्यांनी हवालदार या पदावर BSF मध्ये कार्यरत होते त्यानंतर त्यांनी स्वबळावर आणि अपार मेहनत केल्यने आज उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये LOC, IB सारख्या अतिशय कठोर श्रेत्रात सफलपुर्वक केल्यानंतर ते २०१० ते २०१३ मध्ये ते नक्क्षलवुरोधी अभियानासाठी छत्तीसगड आणि उडिसामध्ये तैनात होते. त्या नंतर २०१३ मध्ये त्यांच्य कतृत्त्वावर ASI या पदावर पदोन्नती झाली.
सिमा सुरक्षा बलामध्ये सर्वोत्कृष्ठ पदक जे की महानिदेशक प्रशस्ती पत्रक आणि मेडल देऊन दिनांक १७/०८/२०१६ रोजी त्यांना सन्मानीत करण्यात आले होते. सध्या ते अमृतसर पंजाब येथे भारत- पाक सिमेवर कार्यरत आहेत. सिमा सुरक्षा बल दालातील त्यांचे योगदान हे अभूतपूर्व व मोलाचे आहे. तसेच ते सर्वांसाठी प्रेरणादायी देखील आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शूभेच्छा.